Maharashtra

शिवनेरी गडाच्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

By PCB Author

February 19, 2020

पुणे, दि.१९ (पीसीबी) – जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना वंदन केले.

अजित पवार म्हणाले,  ‘इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे २३ कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने २३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.’

‘रयतेच खऱ्या अर्थाने राज्य आले आहे. असा एक विश्वास जनतेला वाटतोय,’ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज २३ कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून २३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला २३ कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, असे अजित पवारांनी सांगितले.