शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेस अॅम्बुलन्स भेट

0
384
मळवली, दि.२९ (पीसीबी) – लायन्स क्लब लोणावळा व क्लब महिंद्रा, तुंग यांच्या संयुक्त विद्यमाने दरी खोर्यातील अपघातात मदत करणारी शिवदुर्ग मित्र, लोणावळा या संस्थेस अॅम्बुलन्स भेट देण्यात आली.
लायन्स क्लबचे अध्यक्ष उदयसिंग पाटील साहेब क्लब महिंद्राचे प्रतिनीधी बिपल बॅनर्जी, यांनी शिवदुर्ग मित्रचे  अध्यक्ष अशोक मते याच्याकडे अॅम्बुलन्सची किल्ली /चावी व कागदपत्रे सुपुर्त करण्यात आली. अपघात झाल्यानंतर लवकरात लवकर पोचण्यासाठी, व जखमींना वेळेत उपचार मिळण्यासाठी या अॅम्बुलन्सचा चांगलाच उपयोग होईल. याच पार्श्वभूमिवर लायन्स क्लब लोणावळा व क्लब महिंद्रा तुंग याच्या संयुक्त विद्यमाने दरी खोर्यातील अपघातात मदत करणारी शिवदुर्ग मित्र, लोणावळा या संस्थेस अॅम्बुलन्स भेट देण्यात आली. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी अतिशय महत्वपुर्ण भेट शिवदुर्ग ला मिळाली आहे. असे आपले मनोगत व्यक्त करताना क्लब महिंद्रा तुंग चे व रोटरी क्लब लोणावळा यांचे विशेष आभार मानले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिवदुर्गच्या कार्यांचा गौरव केला आणि शुभेच्छाही दिल्या.
यावेळी लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी साहेब, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन कुमार यादव साहेब, धीरुभाई टेलर, शिवदुर्गचे सर्वेसर्वा अॅड संजय जी वांद्रे, सचिव सुनिल गायकवाड, आनंदजी गावडे सर,संत तुकाराम महाराज गोशाळा संस्थाचे रुपेशजी गराडे, शेखरजी गराडे, शिवसेना मा. शहर प्रमुख राहुलजी शेट्टी, लोणावळा मनसे शहर अध्यक्ष भारतजी चिकने, रमेश नय्यर, मा.नगरसेवक सुभाष सोनवणे, मा.नगरसेवक संजय गायकवाड, मा. नगरसेवक मनोज लऊळकर, रविंद्र कुलकर्णी महिपती मानकर, महेश मसने, दिपक कांबळे,श्री वानखेडे,श्री दामले, श्री घाणेकर, वैष्णवी भांगरे, आशिष मेहता, आदी मान्यवर उपस्थितीत होते.