शिवजयंती उत्सव समितीतर्फे चिंचवड येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0
815
चिंचवड, दि.२० (पीसीबी) – बाल गोपालांची शिव कालीन वेशभूषा, शाहिरांनी सादर केलेले भारदस्त आवाजातील पोवाडे, विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन, शिवव्याख्यान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात चिंचवड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंती उत्सवात लहान मुलांनी शिवरायांवर भाषणे, पोवाडे, नृत्य सादर केले. लहान मुलांसाठी शिवरायांच्या जिवनावर यावेळी निबंध स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिव प्रेमिंनी शिवरायांचे पेन्सिल चित्र व निबंध सादर करून सर्वांनाच थक्क केले. ५ वर्ष ते ५० वर्ष वयोगटातील सर्व शिवभक्तांनी कलागुणांचे सादरीकरण केले. शिवजयंती उत्सव समिती पिंपरी-चिंचवड, पुणे. यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एचसीएल कंपनीच्या माध्यमातून तरूणांना रोजगाराबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक भुषण पुरस्कारप्राप्त शिक्षिका जया जाधव यांनी सुत्रसंचालन केले.
राम महाडीक, शिवाजी मराठे, डिगंबर जाधव, रोशन मराठे, सुनिल जाधव, सुनिल मराठे, विजय जाधव, गजानन शिंगटे, सोमनाथ मराठे, हनुमंत काळे, लहु शेळके, महादु आभाळे, केशव पवार, ज्ञानेश्वर तांबे, राजु पाटील, सचिन चव्हाण यांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, उद्योजक मिलींद शिंगटे, गणेश मराठे, कुंडलीक जाधव, विलास गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.