शिर्डी विमानतळावर ‘त्या’ बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन

0
397

शिर्डी, दि, १३ (पीसीबी) – कर्नाटकांतील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांविरोधात आज शिर्डी येथे युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी शिर्डी विमानतळावर शिरीला देवदर्शन करण्यासाठी आलेल्या बंडखोर आमदारा विरोधात आंदोलन करु जोरदार घोषणाबाजी दिल्या. .

सत्यजीत तांबे यांनी ही घोषणाबाजी करण्याचे कारण म्हणजे हे जे आमदार आहेत त्यांनी कॉंग्रेसशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटकमधील या परिस्थितीला हे बंडखोर आमदारचं जबाबदार आहेत. त्यामुळे तांबे यांनी या आमदारांचा निषेध नोंदवत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात कॉंग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. अशा काळात कार्यकर्त्यांनी पक्षाला पाठींबा देण्याची गरज असताना या आमदारांनी पक्ष सोडल्याने सत्यजीत तांबे यांनी हा विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.