शिरूरमध्ये कंटेनर आणि वॅगनर कारचा भीषण अपघात; २० दिवसांच्या बालकासह तिघांचा मृत्यू

0
442

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पुणे-नगर महामार्गावरील शिरूर येथे कंटेनर आणि वॅगनर कारचा भीषण अपघात झाला असुन त्यामध्ये २० दिवसांच्या नवजात बालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

किशोर हाके, शुभम हाके आणि विमल हाके (सर्व रा. वाघोली मुळ रा. रामतीर्थ, नांदेड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये वॅगनर कारचा चुरा झाला. शनिवारी रात्री वॅगनर कार ही अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने येत होती. वॅगनर कारची बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागुन जबरदस्त धडक बसली. त्यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे हाके कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.