शिरूरजवळील भीषण अपघातात २० दिवसांच्या बाळासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

0
746

शिरूर, दि. २१ (पीसीबी) – अहमदनगर-पुणे महामार्गावर  कंटेनरला मारुती वॅगन आर कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर  एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात  शिरूर बाह्यरस्त्यांवरील पाचर्णे मळा येथे आज (रविवार) पहाटे तीन वाजता झाला.

या अपघातात एका परिवारातील चार जण जागीच ठार झाले.  किशोर माधव हाके,शुभम माधव हाके, विमल माधव हाके अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात पुष्पा किशोर हाके या गंभीर जखमी झाल्या आहेत . तर एका वीस दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये दोन सख्खे भाऊ, एक वीस दिवसांचे बाळ आणि बाळाच्या आजीचा समावेश आहे. मूळचे नांदेड येथील असणाऱ्या किशोर यांना २० दिवसांपूर्वी आपत्य झाले होते. बाळासह आईला पुण्याला घेऊन येताना  हा अपघात झाला.  या अपघातात बाळाची आई सुदैवाने बचावली आहे.  शिरूर पोलीस अधिक तपास करत आहेत.