Pune Gramin

शिरुर पोलिसांनी जप्त केल्या १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा

By PCB Author

June 13, 2019

शिरुर, दि. १३ (पीसीबी) – शिरूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून १ कोटी २६ हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई ७ जूनच्या मध्यरात्री करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर बांधकाम व्यावसायिक फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या नोटा पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या आहेत. नोटबंदीच्या काळात या नोटा बदलण्यासाठी पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाला देण्यात आल्या होत्या. परंतु त्या बदलता न आल्यामुळे हा तरुण जुन्या नोटा घेऊन पुण्याच्या दिशेने कारने येत होता. नाकाबंदीदरम्यान शिरूर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या कारची झडती घेतली असता, या नोटा आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर बांधकाम व्यावसायिक फरार झाला आहे. याप्रकरणाची आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाचे अधिकारी करणार आहेत.