शिरुरमध्ये भाजपच्या तालुका उपाध्यक्षाच्या घरावर दरोडा

0
554

पुणे, दि. २६ (पीसीबी) – शिरूर तालुक्यातील केंदूर येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या घरावर सोमवारी (दि.२६) पहाटे तीनच्या सुमारास दरोडा पडला. यामध्ये साकोरे यांच्या आई-वडिलांना जबरदस्त मारहाण चोरट्यांकडून करण्‍यात आली आहे.

कोंडीबा विठोबा साकोरे आणि लक्ष्मीबाई कोंडीबा साकोरे असे जखमी दोघांची नावे आहेत. या घटनेत अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.