शिरुरमध्ये पिसाळलेल कुत्र चावल्याने वृध्देचा मृत्यू

0
635

कान्हूरमेसाई, दि. १० (पीसीबी) – शिरुर तालुक्यातील शात्ताबाद येथे घरासमोरील ओसरीत बसलेल्या एका ८५ वर्षीय वृध्देला पिसाळलेल्या कुत्र्याने जबरदस्त चावा घेतल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

अजनाबाई बाजीराव गोरडे (वय ८५, शात्ताबाद) असे मयत वृध्देचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, घरासमोरील ओसरीत बसलेल्या अजनाबाई यांना पिसाळलेल कुत्र पायाला, हाताला आणि पोटाला चावले होते. यामुळे अजनाबाई यांचा अतिरक्तस्त्राव झाला. त्यांना उपचारासाठी राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.