शिक्षिकेने मारले म्हणून १३ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

0
508

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिक्षिकेने मारले म्हणून वडाळा येथे एका १३ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.६) घडली.

याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडाळा पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत १३ वर्षीय मुलगी गुरुवार (दि.२७) आणि शुक्रवारी (दि.२८) शाळेत गेली नव्हती. शनिवारी ती शाळेत गेली तेव्हा तिचा होमवर्क अपूर्ण होता. यामुळे शिक्षिकेने तिच्या कानशिलात लगावली. घरी आल्यानंतर काही वेळानंतर तिने घरच्या सिलिंगला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्या दिवशी वर्गात नेमके काय घडले होते, त्याचा पोलीस तपास करत आहेत. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.