शिक्षकी पेशेला काळीमा: पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२ मुलींवर शिक्षकानेच केला लैंगिक अत्याचार

0
526

पुणे, दि. १६ (पीसीबी) – लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने तब्बल १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विक्रम पोतदार असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी विमातळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पदवीधर शिक्षक विक्रम पोतदार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने मागील सहा महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम देत कोणाला काही सांगायचे नाही. असे सांगून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या सहा महिन्यात विक्रम याने तब्बल १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची उघड झाले आहे. विमातळ पोलीस अधिक तपास करत आहेत.