Maharashtra

शिक्षकांच्या बुरसटलेल्या विचारांचा बुरखा पुन्हा एकदा समोर आला

By PCB Author

February 15, 2020

मुंबई, दि.१५ (पीसीबी)) – जरातमधील भुज येथे एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळी सुरु आहे कि नाही हे तपासण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादयक प्रकार घडला आहे. गुजरातमधील भूजमध्ये हा प्रकार घडला असून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

या सर्व घटना प्रकारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा सर्व प्रकार निर्लज्जपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे. ”ज्या महाविद्यालयातात उद्याच्या भविष्याची स्वप्न घेऊन बाहेर पडणार, ज्या ठिकाणी आधुनिक विचारांची मुहूर्तमेढ रोवणार,त्याठिकाणी असे किळसवाणी घटना घडतेय,शिक्षकांच्या बुरसटलेल्या विचारांचा बुरखा पुन्हा एकदा समोर आला.” असे ट्वीट त्यांनी केले आहे

निर्लज्जपणाचा कळस…
ज्या महाविद्यालयातात उद्याच्या भविष्याची स्वप्न घेऊन बाहेर पडणार, ज्या ठिकाणी आधुनिक विचारांची मुहूर्तमेढ रोवणार,त्याठिकाणी असे किळसवाणी घटना घडतेय,शिक्षकांच्या बुरसटलेल्या विचारांचा बुरखा पुन्हा एकदा समोर आला.#Gujrat #Bhuj @GovtOfGujarat

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 15, 2020