शिक्रापूरजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात; ९ जण जखमी ४ गंभीर

0
580

शिक्रापूर, दि. २५ (पीसीबी) – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात ९ वारकरी जखमी झाले असून ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोमवारी (दि.२४) रात्री साडेअकराच्या सुमारास जातेगाव फाट्याजवळ झाला.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या मांगेगाव येथील दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिंडीचा टेम्पो शिक्रापूर येथील चाकण रोडवरील जातेगाव फाट्याजवळ शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने जात होता. यावेळी एका हॉटेल मधून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक टेम्पोला बसली. यामध्ये नऊ वारकरी जखमी झाले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.