शिंदेआळी गोळीबार प्रकरणी जखमी तरुणाच्या घरच्यांना धमकावल्याने मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावर गुन्हा

0
2907

पुणे, दि. २ (पीसीबी) – बुधवारी (दि.३१ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास दोन गटातील वादातून मंगेश धुमाळ या तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेमध्ये मंगेश गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांचा भाऊ रुपेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामुळे रुपाली पाटील आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून मंगेश धुमाळ याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना धमकावले. याप्रकरणी मनिषा धुमाळ यांनी रुपाली पाटील विरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्यानुसार रुपाली पाटील यांच्यावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश धुमाळ आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांचा भाऊ रुपेश पाटील यांच्यामध्ये वाद आहेत. याच रागातून मंगेश धुमाळ याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार करुन धारदार कोयत्याने वार करण्यात आले होते. यामुळे खडक पोलीस ठाण्यात रुपेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे बुधवारी रात्री उशीरा मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मंगेश धुमाळ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबीयांना धमकावले. यावर मनीषा धुमाळ यांनी खडक पोलीस ठाण्यात रुपाली पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.