Maharashtra

शाहू महाराजांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात

By PCB Author

April 27, 2024

कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी तंबू ठोकला आहे. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत, हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचा मोदींवर निशाणाछत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्याव ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी पुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.