शाहीद कपूरचा कबीर सिंह ठरला ‘ब्लॉकबस्टर’

0
743

मुंबई, दि, २७ (पीसीबी) – अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित झाला असून गेल्या काहीच दिवसात या चित्रपटाने बरीच चांगली कमाई केल्याचे दिसते. त्यामुळे शाहिद कपूरला या चित्रपटामुळे करिअरसाठी पुन्हा नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे केवळ पाच दिवसामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे विकडेज मध्ये या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.