शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांना केंद्र सरकारची सिनिअर फेलोशिप जाहीर

0
308

पिंपरी, दि. ०४, (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांना भारत सरकारची शास्त्रीय संगीतातील पीएचडी पदव्युत्तर विशेष संशोधनासाठी सिनिअर फेलोशिप जाहीर झाली आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी) द्वारे कला क्षेत्रातील विशेष संशोधनात्मक कार्य करणा-या व्यक्तींना सिनिअर फेलोशिप देऊन गौरविले जाते.

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ गायक, संगीत संशोधक, संगीत प्रसारक डॉ. घांगुर्डे यांना भारत सरकारची भारतीय शास्त्रीय संगीतातील पीएचडी पदव्युत्तर विशेष संशोधनासाठी सिनिअर फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. या फेलोशिपचा कालावधी दोन वर्षांचा आहे.