“शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या, मात्र…”

0
251

जळगाव,दि.१६(पीसीबी) – शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ झालेले नाही, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

गेल्या 75 वर्षापासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. आधी शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. मात्र आता आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला आहे. मात्र तेव्हापासून शेतकरी हा निसर्गाशी सामना करतोच आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

शेतकरी उद्ध्वस्त झाला असून कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढल्या आहेत. शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ झालेले नाही, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाची सरासरी यंदा अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने पंचनामे केले असेल तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपया सुद्धा पडला नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.