शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी राम

0
731

पुणे दि, २८ (पीसीबी) – शासनाव्दारे ‍विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, की शासनाव्दारे प्रधानमंत्री किसान मानधन योजना व पी. एम.किसान, पूर परिस्थिती मदत वाटप, शासकीय वसूली, ७/१२ संगणीकरण व स्कॅनिंग, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. आतापर्यंत  राबविण्यात आलेल्या  योजनानिहाय आढावाही या बैठकीत घेण्यात आला.