शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, त्यामुळे कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही – राजेश टोपे

0
566

मुंबई,दि.२१(पीसीबी) – खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करा. शासकीय कार्यालयात एसी वापरू नये जमल्यास कमीत कमी वापरावा त्यामुळे कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ वरून ६३ वर गेली असून मुंबई १० नवीन रुग्ण आढळल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनानं ६३ जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या ५२ होती आता ती थेट ६३ झाली आहे. या नवीन रुग्णांत १० मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक ८ आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती टोपेंनी दिली आहे