Maharashtra

शालेय शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय; “….म्हणून सराव पाठशाळांना लावलं कायमच टाळं”

By PCB Author

September 17, 2020

मुंबई, दि.१७(पीसीबी) : शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी अध्यापन विभागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली असून काही ठिकाणी विद्यार्थी संख्या शून्यावर गेली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सराव घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या 10 सराव पाठशाला कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता आणि तो आता मंजूर झाला आहे. पुणे येथील लोणी काळभोरमधील सरकारी अध्यापक सराव पाठशाळा, अमरावतीतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी सलग असलेली पाठशाळा अशा दोन्ही पाठशाळा विद्यार्थी संख्या नसल्याने तातडीने बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित बाकी असलेल्या आठ पाठशाळांमधील विद्याध्यांचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याचं समजतंय. यामध्ये पुणे येथील भवानी पेठ, मोदीखाना, अमरावतीतील वलगाव रोड, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा येथील सराव पाठशाळा आहेत.

बंद केलेल्या सराव पाठशालांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 30 नोव्हेबरपूर्वी अन्य ठिकाणी रिक्त पदे समायोजन होणार आहे. दरम्यान, तेथील शिक्षक आणि कर्मचारी यांचे समायोजन रिक्त पदांवर नंतर करण्यात येणार आहे आणि शिवाय यासंबंधीचे समायोजनाचे अधिकार शिक्षण आयुक्तांना आहेत.