Maharashtra

शांतता राखण्यासाठी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

By PCB Author

August 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

याच पार्श्वभुमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मात्र याआधीच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यामुळे २२ ऑगस्ट या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.