Chinchwad

 शहीद भारतीय सैनिकांना वाकडवासियांनी वाहिली श्रद्धांजली

By PCB Author

February 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – वाकड, कास्पटेवस्ती भागातील गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी वाकड येथील दत्त  मंदिरात एकत्र येत पुलवामा  दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी  ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देण्यात आल्या.  यावेळी काढण्यात आलेल्या  मोर्चात लहान मुलांपासून वयोवृध्द  नागरिक सहभागी झाली होते. सर्वांनी मेणबत्ती लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच राष्ट्रगीत गाऊन श्रद्धांजली वाहिली.

श्रध्दांजली कार्यक्रमाचे  नियोजन व संकल्पना मयुर  कलाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महासंघाने सहभाग घेतला. यावेळी सचिन लोंढे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.