शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पेट्रोल पंप अर्धा तास बंद राहणार

0
943

मुंबई, दि. २० (पीसीबी) – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व पेट्रोल पंप आज (बुधवार) रात्री ७ ते ७.३० या काळात  बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनने दिली आहे.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कन्सोर्टिअम ऑफ इंडिअन पेट्रोलिअम डिलर्सने (सीआयपीडी) सदस्यांना आपले पेट्रोल पंप आणि इंधन स्टेशन्स वीस मिनिटांसाठी बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

आज  राज्यातील सर्व पेट्रोल पंप रात्री ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात पेट्रोल-डिझेल तसेच इतर कोणत्याही इंधनाची विक्री केली जाणार नाही.  या काळात सर्व पेट्रोल पंपांवरील दिवेही बंद करण्यात येणार आहे, असे सीआयपीडीचे राज्यातील सचिव रवि शिंदे  यांनी सांगितले.