शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी अमिताभ बच्चनकडून पाच लाखांची मदत

584

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी  प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही मदत कशाप्रकारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत करणार आहेत. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती रद्द केली होती.

दरम्यान, जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि.१४) पुलवामा जिल्ह्य़ात घडवून आणलेल्या  भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत.  या हल्ल्यावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.