शहरातील म्हेत्रेवस्ती व कुदळवाडी या दोन ठिकाणी एकाच टोळीने सोमवारी (दि.२) रात्री उशीरा दोनच्या सुमारास कोयता आणि तलवारीचा दाख दाखवून हजारोंची लुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली), वसीम शेख (रा. ओटा स्कीम, निगडी), विशाल खरात (रा. ओटा स्कीम, निगडी), अजय चौधरी, राहुल दांडे आणि अन्य दोन अनोळखी दरोडेखोरांविरुध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भागीराम चौधरी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागीराम चौधरी म्हेत्रेवस्ती मधील सिद्दीविनायक सोसायटी मध्ये राहतात. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास वरील सात  दरोडेखोर त्यांच्या सोसायटीमध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी कोयते  आणि तलवारींचा धाक दाखवून भागीराम चौधरी यांचा एक मोबाईल, आर्या चौधरी यांचे पाकीट व रोख रक्कम, कन्हैया चौधरी यांच्याकडील रोख रक्कम असा एकूण सात हजार ५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच आकाश भीम थापा, मौसम चौधरी या दोघांना मारहाण केली. यामध्ये हे दोघे जखमी झाले आहेत.

यानंतर याच टोळीतील हल्लेखोरांनी कुदळवाडी येथील कृष्णा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घुसून कंपनीतील कामगार सुबेंदू पात्रा आणि गौरीशंक गुरुलिंगय्या स्वामी यांना मारहाण बेदम मारहाण केली. तसेच कंपनीतील कामगार हरिलाल रामूजागीर यांचा मोबाईल फोन चोरून नेला. आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

शहरात एकाच दिवशी सलग दोन ठिकाणी झालेल्या दरोड्यांच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच पोलीस प्रशासनावर देखील प्रशनचिन्ह उपस्थि केले जात आहेत. ज्या ठिकाणी दरोड्याच्या घटना झाल्या त्या ठिकाणी रात्रीचे गस्तीचे पोलीस कोठे होते, पोलीस घटना स्थळी वेळेवर का पोहचू शकले नाही, असे असंख्य प्रशन नागरिकांनी उपस्थि केले आहेत.