“शहरातील सर्व नदी घाटांवर छठ पूजेसाठी सेवा, सुविधा उपलब्ध करुन देणार”: ॲड. नितीन लांडगे

0
302

पिंपरी,दि. 22 (पीसीबी) – उत्तर भारतीय नागरिकांचा छठ पूजा उत्सव 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील उत्तर भारतीय नागरिक दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने इंद्रायणी आणि पवना नदिच्या घाटांवर हा उत्सव साजरा करतात. परंतू मागील दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे उत्सवास परवानगी नव्हती. या वर्षी परवानगी मिळाल्यास सर्व नियमांचे पालन करीत शहरातील दोन्ही नद्यांच्या सर्व घाटांवर छठ पूजा उत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले.

शुक्रवारी (दि. 22 ऑक्टोबर) ॲड. नितीन लांडगे आणि उत्तर भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी तसेच विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी मनपाच्या अधिका-यांसमवेत मोशी येथे इंद्रायणी घाटाची पाहणी केली. यावेळी ॲड. नितीन लांडगे यांनी प्रशासनाला आदेश दिले की, छठ पूजेसाठी जमणा-या नागरिकांना, पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि आवश्यक इतर सेवा सुविधा, सुरक्षा उपलब्ध करुन द्यावेत घाटाची व नदिपात्राची स्वच्छता करुन घ्यावी.

विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, दिवाळीनंतर चार दिवसांनी दरवर्षी संपुर्ण भारतात छठ पूजा हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत हा उत्सव होणार आहे. सर्व धार्मिक पूजा, विधींबरोबरच मोशीतील इंद्रायणी घाटावर यावर्षी ‘भव्य गंगा पूजन आणि आरती सोहळा’ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उत्सवात भक्त भाविकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे असेही आवाहन लालबाबू गुप्ता यांनी केले.