Pimpri

शहरातील विविध विकास कामांसाठी ५५ कोटींच्या खर्चास स्थायीची मंजुरी

By PCB Author

September 04, 2019

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चापेकर शिल्पसमुह, मोरया मंदिर ते थेरगाव कल्बपर्यतचा परिसर सुशोभीकरणासाठी येणाऱ्या सुमारे ७ कोटी ९५ लाख खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे  ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास आज (बुधवार)  स्थायी समितीच्या बैठकीत  मंजुरी देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज  झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

प्रभाग क्र. १६ मध्ये खंडोबामाळ चौक ते म्हाळसाकांत चौक  पर्यत पालखी मार्गाचे कॉक्रिटीकरण करणेकामी येणा-या सुमारे ७४ लाख ४३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ५  गवळीनगर सॅण्डविक कॉलनी येथील मनपा इमारतींची दुरुस्ती करणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ९७ हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ११ मध्ये फुलेनगर शिवाजी पार्क इत्यादी ठिकाणी फुटपाथ विषयक कामे  करणेकामी येणा-या सुमारे  ३२ लाख ६६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.५९ मधील शितोळेनगर, सातपुडा व आनंदनगर भागातील रस्त्याचे युटीडब्लुटी पध्दतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २६ वाकड पिंपळे निलख येथे विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करणे व स्थापत्य विषयक कामे  करणेकामी येणा-या सुमारे ९३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २ मध्ये विविध ठिकाणी विद्‌युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ११ लाख  रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आले.