शहरातील विविध विकासकामांसाठी ५० कोटींच्या खर्चास स्थायीची मंजुरी

0
628

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी निश्चित मिशन स्वावलंबन हा उपक्रम राबविणेकामी  येणा-या सुमारे ३ कोटी ४८ लाख रूपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी येणा-या एकूण  ४९ कोटी ९९ लाख ६८ हजार  रूपयांच्या खर्चास आज (गुरूवार)  स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या  सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

प्रभाग क्र. २५ ताथवडे गावठाणपासून जीवननगर मार्गे स.नं.९९ व १०० मधून पुनावळेकडे जाणारा २४ मीटर रूंद रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३० कोटी ०६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मैला शुद्धीकरण केंद्र व पंपींग स्टेशनच्या अखंडीत वीज पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडर बसवणे व आवश्यक अनुषंगीक कामे करणेकामी येणा-या सुमारे ७ कोटी ४३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, महादेवनगर, मोहननगर परिसरामध्ये रस्त्यांची खडीकरण व बी.बी.एम पद्धतीने सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे५१ लाख १६हजार रूपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

इ प्रभागातील विविध टाक्यावरून पाणीपुरवठा करण्यासाठी मजूर पुरविणेकामी येणा-या सुमारे १ कोटी २०लाख रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

भाट नगर येथील लिंक रोडवरील विद्युत दाहीनीचे नुतनीकरण करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ३० लाख रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मध्ये धावडे वस्ती, सदगुरू नगर, भगतवस्ती मधील नाल्याची सुधारणा  करणेकामी येणा-या सुमारे ४५ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ग क्षेत्रीय कार्यालयातील कचरा उचलणे व वाहतुक करणेकामी येणा-या सुमारे २३ लाख रूपयाच्या रकमेस मान्यता देण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यक्षेत्रातील सर्व कचरा कुंड्या, रस्त्यांचे, गटर्सच्या कडेने कच-याचे ढीग, मोकळ्या जागेतील कच-याचे ढीग, उचलणे व त्याची वाहतूक करून भोसरी स्थानांतर केंद्र अथवा मोशी डेपो येथे टाकणेकामीच्या सुमारे २० लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

सारथी हेल्पलाईन अंतर्गतकॉल ऑपरेटर नियुक्त करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विविध शहरी गरीब वस्तीमध्ये प्रकाश व्यवस्था करणे व इतर विद्युत विषयक तत्सम कामे करणेकामी सुमारे २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.