Pimpri

शहरातील ‘या’ स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता पोलिसांना समजताच…….

By PCB Author

July 23, 2021

सांगवी, दि. २३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथे कोकणे चौकात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. तर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कोकणे चौक, पिंपळे सौदागर असलेल्या झेन स्पा नावाच्या स्पा सेंटर येथे करण्यात आली.

प्रकाश उर्फ पप्पू उत्तम अडसूळ (वय 45, रा. अहिंसा चौक, चिंचवड), प्रवीण माधवराव सूर्यवंशी (वय 27, रा. रहाटणी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशी याला अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे आरकेएल बिझनेस सेंटरमध्ये असलेल्या झेन स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. तसेच 12 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.