शहरातील मॉल्स आता ‘या’ वेळेत राहणार सुरु

0
328

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने राज्य सरकारने 14 एप्रिल रोजी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर अत्यावश्यक वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. आजपासून पिंपरी चिंचवड मध्ये सुधारित आदेशानुसार 50 टक्के क्षमतेने मॉल्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू झाले आहेत.

पुण्यात काही दिवसांपूर्वी मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र, पिंपरी चिंचवड क्षेत्रात शनिवार रविवार वगळता सर्व दुकाने फक्त चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनी सुधारित आदेश काढून सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेण्यास परवानगी दिली आहे. तसेच, 50 टक्के क्षमतेने मॉल्स देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार, रविवार मात्र फक्त आत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

मॉल्स सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी हजेरी लावली होती. मोबाईल, ईलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी तसेच, कापड्यांच्या स्टोरवर लोकांनी खरेदीसाठी उपस्थिती लावली होती. मॉल्समध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी पावलांचे ठसे उठवण्यात आले आहेत, तसेच, सॅनिटाझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. सिनेमागृह उघडण्यास अद्याप परवानगी नसल्याने मॉल्समधील सिनेमागृह बंदच आहेत.