शहराच्या ‘या’ भागांतून तब्बल नऊ दुचाकी चोरीला

0
286

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून नऊ दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत सोमवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात वाहन चोरांची टोळी सक्रिय असून चोरट्यांचे उपद्व्याप दिवसेंदिवस वाढत आहेत.

साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथून एक मोपेड दुचाकी (एम एच 12 / सी जी 5574) अज्ञात चोरट्यांनी 20 डिसेंबर रोजी दुपारी बारा ते चार वाजताच्या कालावधीत चोरून नेली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महेश अर्जुन भागवत (वय 27, रा. सुसगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

लांडेवाडी भोसरी येथील अॅम्फेनॉईल इंडिया प्रा ली या कंपनीसमोरून 19 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी अडीच या कालावधीत एक दुचाकी (एम एच 14 / ई के 7875) चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पृथ्वीराज पांडुरंग देशमुख (वय 26, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्लिम पिरीमहंमद सय्यद (वय 51, रा. कासारवाडी) यांची दुचाकी (एम एच 14 / डी जी 4326) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. शरद जिजाभाऊ जठार (वय 33, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांची रॉयल इन्फिल्ड बुलेट (एम एच 14 / जी पी 0043) दिघी रोडवरील समाधान हॉटेल समोरून चोरून नेली. या बाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद सुलेमान घांची (वय 30, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची सीबीझेड दुचाकी (एम एच 14 / बी झेड 1542) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.

अविनाश साहेबराव दौंडकर (वय 32, रा. दौंडकरवाडी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांची दुचाकी (एम एच 12 / जे एच 9995) च-होली खुर्द येथील एका इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात विशाल आनंद कुलकर्णी (वय 39, रा. कुमठा नाका, सोलापूर) यांनी त्याच्या सीबीझेड दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 15 / सी ए 9288) शरदनगर येथून चोरून नेली आहे.

मित्राच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी (एम एच 14 / डी वाय 5463) चोरीला गेल्याबाबत गुरविंदरसिंग दर्शनसिंग सैनी (वय 39, रा. हैद्राबाद, तेलंगणा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ख्रिसमस सण जवळ आल्याने चर्चमधील कपडे, पडदे, चटई धुण्यासाठी सदानंद दत्तात्रय भोरे (वय 62, रा. देहूरोड) त्यांच्या मोपेड दुचाकीवरून किन्हई गावातील धरणाजवळ गेले. धरणात कपडे धूत असताना अज्ञात चोरटयांनी त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एस बी 2895) चोरून नेली. याबाबत भोरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.