शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
532

दिघी, दि. ३० (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दिघी जकात नाका चौकात केली. दिवाकर सुरेंद्र सिंग (वय 24, रा. पांडेनगर, दिघी), प्रतिक दौलत मोहड (वय 21, रा. गणेशनगर, बोपखेल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत पोलीस शिपाई विजय जगन्नाथ पाटील यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात लाठ्या-काठ्या, शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपींनी लोखंडी कोयता जवळ बाळगला. याबाबत पोलिसांनी दोघांवर हत्यार कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.