शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार, राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता

680

नवी दिल्ली,दि.१६(पीसीबी) – शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की नाही हे उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे.शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर उद्याच्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.