शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने “आशा वर्कर” यांच्या सन्मान

0
508

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सन्मान करा….. रुपाली चाकणकर

पिंपरी, दि.17 (पीसीबी ) कोरोना काळात आपण सर्व सुरक्षित कोषात राहण्याचा प्रयत्न करीत होतो, पण
त्याचवेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालून ज्यांनी कर्तव्य बजावले त्यांचा सन्मान केला पाहिजे व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते “आशा वर्कर” यांच्या सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 16) चिंचवड येथे झालेल्या याकार्यक्रमास राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, माजी महापौर अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, सुलक्षणा शिलवंत, पक्षप्रवक्ते फझल शेख, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, माजी नगरसेविका शमीम पठाण तसेच विजय लोखंडे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सामाजिक न्याय सेलच्या अध्यक्ष गंगाताई धेंडे, अरुणा कुंभार, संगिता कोकणे, मनिषा गटकळ, पल्लवी पांढरे, शिल्पा बीडकर, उज्वला ढोरे, जन्नत सय्यद, दीपाली देशमुख,आशा शिंदे, शीला भोंडवे,कविता आल्हाट, सुप्रिया पवार,माहेश्वरी परांडे, ज्योती गोफने,सपना घाडगे,मीना कोरडे, सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच सन्मानार्थी आशा वर्कर उपस्थित होत्या.

यावेळी चाकणकर म्हणाल्या की, कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, पोलिस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, भाजी विक्रेता शेतकरी, दूधवाला हे आपल्यासाठी देवदूत होते. त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. या काळात कर्तव्य बजावणाऱ्या अनेकांचा या महामारीत बळी गेला. त्यांच्या कुटुंबाचीहाणी पैशाने भरून निघणार नाही. सरकार त्यांना मदत करेलच पण आपण सर्वांनीही अश्या कोरोना योद्धांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे चाकणकर म्हणाल्या.