Others

शरद पवार यांच्याकडून साने, लांडे कुटुंबियांचे सांत्वन

By PCB Author

July 07, 2020

 

शरद पवार यांच्याकडून साने व लांडे कुटुंबियांचे सांत्वन

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले, तर माजी आमदार विलास लांडे यांचे आई आणि वडिलांचे वृध्दापकाळाने एका महिन्यात निधन झाले. राष्ट्रवादीच्या या स्थानिक नेत्यांच्या दुखात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी पिंपरी चिंचवडचा दौरा केला. सकाळी अकराच्या सुमारास चिखली साने वस्ती येथील दत्ता साने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कुटुंबियांची विचरपूस केली. साने यांच्या आई, पत्नी, मुले आणि भावांची त्यांनी विचारपूस केली.

दुपारी बाराच्या सुमारास पवार यांचा ताफा भोसरी लांडेवाडी येथील माजी आमदार विलास लांडे यांच्या निवासस्थानी आला. तिथे पवार यांनी लांडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या दौऱ्यात पवार यांच्या समवेत पक्षाचे शहराध्यक्ष संजोग लाघेरे, विरोधी नेते नाना काटे, जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.