Desh

शरद पवार मुख्यमंत्री होण्याचे संकेत सोनिया गांधींच्या भेटीला शरद पवार दिल्लीत

By PCB Author

November 04, 2019

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी परिस्थिती आता अनुकूल झाली असल्याचे चित्र आहे. तसेच शरद पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आघाडी आणि शिवसेना एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन करणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

याविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटेत ते सत्ता स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्याची दात शक्यता आहे. परंतु शरद पवार यांनी राष्ट्रवादी ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ते आता हा निर्णय बदलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी संजय राऊत यांनी मला मेसेज केला. मी बैठकीत असल्यामुळे रिप्लाय करु शकलो नाही. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मला मेसेज का केला, हे माहिती नाही. असे विधान केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.