शरद पवार, प्रकाश आंबेडकरांना एकत्र बसायचे नसेल, तर मी काय करणार?-लक्ष्मण माने

0
1155

पुणे, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांशीही माझे जवळचे संबंध आहेत. त्यांनी एकत्र बसावे, अशी माझी इच्छा आहे.मात्र, माझ्या इच्छेप्रमाणे घडले नाही तर  मी काय करणार? मी छोटा कार्यकर्ता आहे,  असे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे.

पवार आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मात्र, माझे आणि त्यांचे राजकीय संबंध नाहीत.घरगुती जिव्हाळा असणे वेगळे आणि राजकारण वेगळे. मी राजकीयदृष्टया पवार यांच्यापासून २००९ पासून दूर गेलो आहे.

पवार आणि आंबेडकर यांनी एकत्र बसावे, असे मलाही वाटते. मात्र, तसे घडले नाही तर मी काय करणार? मी छोटा कार्यकर्ता आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा भाग आहे. त्यामुळे ही आघाडी मजबूत होण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे माने म्हणाले.