शरद पवार चालतं बोलतं विद्यापीठच!

0
534

मुंबई, दि.८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतू मुंबईला येत असताना त्यांच्या शेजारी परभणीतला एक तरुण प्रवास करत होता. पवार आपल्या शेजारी आहेत या कल्पनेनच तो तरुण हरखून गेला आणि पवारांनीही अगदी सहजपणे त्याला विमानातून जमिनीचा इतिहास सांगितला. तो VIDEO आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. यावेळी ते म्हणाले, “विमानात तरुणाशी संवाद साधणारा शरद पवार यांचा व्हिडीओ पाहिला. यात शरद पवार चालतं बोलतं विद्यापीठच! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हातानं जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे!”

विमानात तरुणाशी संवाद साधणारा आदरणीय पवार साहेबांचा व्हिडीओ पाहिला. साहेब म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच ! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हाताने जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे! Sharad Pawar Nationalist Congress Party – NCP

Gepostet von Jayant Patil – जयंत पाटील am Freitag, 7. Februar 2020