शरद पवार एनडीएला पाठिंबा देऊ शकतात – नारायण राणे

0
599

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – बहुतांश एक्झिट पोलने पंतप्रधान  मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला असताना महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत एक मोठे विधान केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.    

वृत्तवाहिनी आणि संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार ‘एनडीए’चे सरकार  केंद्रात पुन्हा एकदा  विराजमान होईल, अशी शक्यता वर्तवली  आहे.  परंतु काही माध्यमांच्या अंदाजानुसार ‘एनडीए’बहुमत गाठता येणार आहे.

याविषयी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना   नारायण राणे म्हणाले की,  राष्ट्रवादी अध्यक्ष  शरद पवार हे भाजपला सत्ता स्थापनेसाठी मदत करू शकतात. भाजपला बहुमत न मिळाल्यास शरद पवार भाजपला मदत करू शकतात.  त्याचबरोबर एक्झिट पोलवर   आपला विश्वास नाही,  असेही नारायण राणे म्हणाले आहेत.