Notifications

शरद पवारांशी दुष्काळावर भरचौकात चर्चेला तयार; चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान

By PCB Author

May 11, 2019

सोलापूर, दि. ११ (पीसीबी) – राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर शासन गंभीर असून जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी कार्यकर्ता, आपण दुष्काळाच्या प्रश्नावर भरचौकात सर्वासमक्ष चर्चा करायला तयार आहोत, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आक्रमक पध्दतीने खुले आव्हान दिले आहे.