शरद पवारांवर उद्यनराजेंनी कोणत्या अवस्थेत टीका केली, हे पाहावे लागेल – जयंत पाटील

0
508

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – माजी खासदार उदयनराजे आता फेडतायत, ते निवडणुकीतही फेडतील. मात्र, शरद पवार यांच्यावर त्यांनी कोणत्या अवस्थेत टीका केली, हे पाहावे लागेल. त्याशिवाय उदयनराजेंविषयी अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या जन्मात केलेल्या गोष्टी याच जन्मात फेडाव्या लागतील, अशी टीका  उदयनराजे यांनी केली होती. या टीकेला पाटील यांनी चोख प्रत्युत्तर  दिले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे का, असा सवाल उदयनराजे यांना  केला असता  ते म्हणाले की, याविषयी तुम्ही संबंधित व्यक्तींना विचारले तर बरे होईल. कारण, मी कोणत्याही खात्याचा मंत्री नाही. तसेच व्यक्तीद्वेषातून मी कधी कोणावर टीकाही करत नाही. आपण जसे वागतो, ते याच जन्मी आपल्याला फेडावे लागते. मीदेखील काही चुकीचे केले असेल, तर मलाही ते फेडावे लागेल, असे उदयनराजे यांनी सांगितले.