शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराकडून प्रेरणा घ्यावी – मोदी  

0
699

अकलूज, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या परिवारांकडून शरद पवार यांनी प्रेरणा घेतली असती, तर पुरेसे झाले असते, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.  

अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन आज (बुधवार) करण्यात आले होते. यावेळी मोदी  यांनी पुन्हा एकदा पवारांवर हल्लाबोल केला.

यावेळी मोदी म्हणाले की, माझ्या परिवाराच्या असण्या-नसण्यावर  पवारांनी टीका केली. कुठल्याही व्यक्तीला परिवाराची साथ असणे ही मोठी ताकत आहे. परिवाराच्या विषयात पवारांना माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते त्यांची समज आणि संस्काराच्या अनुभवाने बोलत आहेत, अशी उपरोधिक टीका मोदींनी पवारांवर केली.

अनेक महापुरुषांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.  अनेक महापुरुषांचे परिवार  माझी देखील प्रेरणा आहेत. आम्ही या परिवारांकडून प्रेरणा घेतो.  मात्र, तुमचे मॉडेल दिल्लीतील एक खास परिवार आहे. तुम्ही त्यांचीच सेवा करा, असा टोला मोदी यांनी पवारांना लगावला.