Maharashtra

शरद पवारांना पाकिस्तानातील मुसलमानांची काळजी

By PCB Author

January 24, 2020

बारामती, दि.२४ (पीसीबी) – शरद पवार यांना पाकिस्तानातील मुसलमानांची भलतीच काळजी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भारतातल्या नातेवाईकांना भेटण्याची पाकिस्तानच्या मुस्लिमांची इच्छा आहे. मात्र, ते मुस्लीम असल्याने त्यांना भारतात येण्यास परवानगी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की, त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले. पाकिस्तान,बांग्लादेश या देशात हिंदूंची अत्यंत दयनीय स्थिती असल्याचे विविध रिपोर्ट्समधून समोर येत आहे मात्र त्यावरही बोलतील अशी अपेक्षा असताना पवार यांना त्या ठिकाणी असणाऱ्या मुसलमानांची जास्त काळजी असल्याचे दिसून येत आहे.

क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की,त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही. pic.twitter.com/78XWEajHjG

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2020