शरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आवाहन

0
874

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रावर भयंकर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात देशवासीयांवर संकट आले असताना शरद पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही कार्यक्रम न घेता आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी.

लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाही शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानध्ये १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.