Maharashtra

शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात…

By PCB Author

October 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी)  – शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेमुळे सर्वांनाच नवी उर्जा मिळाली आहे. साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली, अशा शब्दांत  ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी  प्रतिक्रिया दिली   आहे.

शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला, पण पवारांनी भर पावसात आपले भाषण थांबवले नाही.  पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. त्यातच आता शरद पवार यांच्या कन्या आणि  सुप्रिया सुळे यांनी  ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.