शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याकडे छगन भुजबळांची दांडी; चर्चांना पुन्हा उधाण  

0
525

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात केली. या बैठकीकडे  राष्ट्रावीदीचे नेते छगन भुजबळ यांची अनुपस्थिती होती.  यामुळे पवारांच्या नाशिक दौऱ्यापेक्षा  भुजबळांच्या अनुपस्थितीचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काही दिवसापूर्वी भुजबळ  शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.  मात्र, दोन दिवसांपूर्वीच भुजबळांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केले होते.  या चर्चांवर पडदा पडला होता.

सध्या छगन भुजबळ  काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जागा वाटप संदर्भातील बैठकीसाठी मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून समीर भुजबळ हे शरद पवारांच्या बैठकीस उपस्थित आहेत. मात्र, तरी देखील छगन भुजबळांची पवारांच्या दौऱ्यादरम्यानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.