शरद पवारांचं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट; म्हणतात…

0
968

मुंबई,दि.१७(पीसीबी) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे.

समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यांंनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली असुन आज दिवसभर अनेक दिग्गज नेते शिवतिर्थावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.