शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया

0
885

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांची मराठा आरक्षणप्रश्नी चर्चेत मध्यस्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घटनादुरुस्तीचे विधान यावरुन शिवसेनेचे आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. शरद पवार हे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.

‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्री आणि सर्व आमदारांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकट्या नारायण राणेंना भेटतात कसे? राणेंना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, असे म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर नारायण राणेंना भेटणार असतील, तर एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना त्यांनी विश्वासात घेतले पाहिजे, अशी मागणी आमदारांनी यावेळी केली.

दरम्यान, शरद पवारांची भूमिका संशयास्पद आहे, शरद पवार हे मराठ्यांच्या पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आमदारांनी बैठकीत दिली.