Notifications

शबरीमला: महिलांना आजपासून मंदिर प्रवेश; केरळमध्ये तणाव

By PCB Author

October 17, 2018

तिरूअनंतपुरम, दि. १७ (पीसीबी) – मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज, बुधवारी संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडले जाणार आहे. मात्र मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली व महिलांना रोखल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.